logo

घरातील सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो का ? कायदा काय सांगतो

Property Rights : कुटुंबात अनेकदा संपत्तीच्या कारणावरून मोठे वाद-विवाद पाहायला मिळतात. अनेक प्रकरणांमध्ये असे पाहायला मिळाले आहे की, नवरा-बायकोमध्ये वादविवाद झाल्यानंतर असे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात.
अशावेळी बायको आपल्या पतीच्या आणि सासरच्या संपत्तीवर दावा ठोकत असते.

मात्र कायद्याने असा अधिकार तिला मिळतो का हा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. घरातील सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो का ? याबाबतीत कायद्यात काय तरतूद आहे याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.

घरातील सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो का ?

घरातील सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळतो की नाही ? खरेतर, याबाबत हिंदू उत्तराधिकारी कायद्यामध्ये सविस्तर तरतूद देण्यात आली आहे. यानुसार, कोणत्याही हिंदू कुटुंबातील सुनेला जोपर्यंत तिचा पती हयात आहे तोपर्यंत वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकत नाही.

म्हणजेच एखाद्या महिलेचा पती जोपर्यंत हयात असेल तोवर तिला तिच्या पतीच्या अथवा सासरच्या वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळणार नाही. म्हणजेच पती जोवर हयात आहे तोपर्यंत महिलेला तिच्या सासरच्या मालमत्तेत हिस्सा मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही.

मात्र जेव्हा तिच्या पतीचे निधन होते तेव्हा तिच्या पतीच्या वाट्याला येणारी वडीलोपार्जित मालमत्ता ही तिला मिळते, हा तिचा अधिकार असतो.

जर पती हयात नसेल आणि सासरच्या मंडळीने सदर विधवा महिलेला तिला मालमत्तेत अधिकार देण्यास नकार दाखवला तर ती अशा प्रकरणांमध्ये कोर्टात जाऊ शकते.

विवाहित महिलेला आपल्या वडिलांच्या संपत्ती हिस्सा मिळतो का?

अनेकांच्या माध्यमातून हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. विवाहित महिलेला आपल्या वडिलांच्या संपत्तीत देखील हिस्सा मिळतो का ? हा प्रश्न उपस्थित होत होता.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कायद्याने मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत तिच्या भावंडांप्रमाणेच समान अधिकार देण्यात आले आहेत.

म्हणजेच मुलाला आणि मुलीला कायद्याने समान अधिकार प्रदान केले आहेत. वडिलांच्या संपत्तीत मुलगा जेवढा दावेदार असतो तेवढीच दावेदार मुलगी देखील आहे. यामुळे जर मुलीचे लग्न झाले अन तीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार हवा असेल तर ती याप्रकरणी कोर्टात धाव घेऊ शकते.

अथवा तिला जर तिला मिळणारी तिच्या वडिलांची संपत्ती तिच्या भावाला द्यायची असेल तर ती हक्क सोड प्रमाणपत्र देऊन ती संपत्ती तिच्या भावाला ट्रान्सफर करू शकते.
जन जन की आवाज सोशल मीडिया
रिपोर्ट शिवाजी श्रीमंगले

7
1327 views